मी अजुनही आठवतोय !...
तुझ ते सोज्वळ रूप.
तुझ्या त्या श्वासातली ऊब,
तुझ ते चोरून बघण, आणि
नज़र चुकवून गालातल्या गालात हसणं .
मी अजुनही आठवतोय !...
तो मावळता सूर्य,
समुद्राचा तो खळखळाट .
पायावर घेतलेलं ते समुद्राचे पाणी, आणि
एकाच हेडफोन्स मधून दोघांनीही ऐकलेली
ती F.M. ची गाणी.
मी अजुनही आठवतोय !...
ती माझ्या मिठितली कधी नाजुक,
तर कधी अल्हड तू !..
कधी लाजणारी तर,
कधी उगीच रूसणारी तू.
मी अजुनही आठवतोय !...
कधी न संपावी अशी वाटणारी ती संध्याकाळ, आणि
नकळतच रात्र संपून समोर आलेला तो उष:काल
तो मावळता सूर्य,
समुद्राचा तो खळखळाट .
पायावर घेतलेलं ते समुद्राचे पाणी, आणि
एकाच हेडफोन्स मधून दोघांनीही ऐकलेली
ती F.M. ची गाणी.
मी अजुनही आठवतोय !...
ती माझ्या मिठितली कधी नाजुक,
तर कधी अल्हड तू !..
कधी लाजणारी तर,
कधी उगीच रूसणारी तू.
मी अजुनही आठवतोय !...
कधी न संपावी अशी वाटणारी ती संध्याकाळ, आणि
नकळतच रात्र संपून समोर आलेला तो उष:काल
-----------
- साहिल
-----------
No comments:
Post a Comment