Monday 24 December 2012

कस गं जमतं तूला ?

कस गं जमतं तूला ?
सारख माझ्या आठवणीत येणं
अवती भोवती असल्याचा सारख, भास् करवून देण.

कस गं जमतं तूला ?
नेहमीच गालात गोड हसण,
हळूवार पण सारख काळजावर, घाव घालणं.

कस गं जमतं तूला ?
भावानांना आवरून धरणं,
मन सागरा सारख अशांत असतानाही
शांत आणि खंबीर दिसणं.

कस गं जमतं तूला ?
प्रत्येक प्रश्नाच पटकन उत्तर देणं,
आणि बोलता बोलता एकदम,
डोळ्यात भावनांच आभाळ दाटणं

कस गं जमतं तूला ?
दूर असताना देखिल कायम साथ देत राहणं,
शब्दांच्या पलिकडे जाउन, मनात घर करून राहणं.

कस गं जमतं तूला ?
मी नसताना देखिल माझ्या आठवणीत झुरत राहणं, आणि
फ़ोन वरती मग कापऱ्या आवाजात माझी काळजी करत राहणं.

हे सगळ तूला जमत असल तरी माला फ़क्त जमते
तूझ्या वर खुप खुप प्रेम करत राहणं.

-----------
-साहिल 
-----------

Saturday 15 December 2012

सांग तू येशील का ?...

अस्थिर हे मन माझे
शांत कधी होईल का ?
क्षण हे उड़ती कापुरासम
सांग तू येशील का ?

प्रश्न आहेत बरेच आज
पण आयुष्य हे क्षणभंगुर ...
क्षणात जी बदले ती ,
"तक़दीर" तू होशील का ?
सांग तू येशील का ?.....

होती क्षणों-क्षणी भास् तुझे...
अन करती कायम अस्वस्थ मला,
करील शांत जो ह्या विचारमंथनाला
तो स्पर्श तू होशील का ?
सांग तू येशील का ?....

न करता आले व्यक्त मला
अन होईल हे व्यक्त कधी ?
अव्यक्त आणि निशब्द ह्या प्रेमाचे
शब्द तू होशील का ?

सांग तू येशील का ?... सांग तू येशील का ?

------------
- साहिल 
------------

Friday 14 December 2012

आठवणीतला पाउस !....

पाऊस तसा
खुप शहाणाय !
मला चिम्ब भिजवून आता,
तुझ्याच घरा कड़े निघालाय.

मी क्षणभर हाच
विचार करतोय की,
तुला घरा बाहेर येण्याचा
आणखी एक बहाणा मिळतोय.

हळूच मग मी
मनाला कही सांगतो,
तुझ्या आणि माझ्या जुन्या
आठवणी जरा वर काढतो !

उठून मग मी पुन्हा
भिजत राहतो पावसात.
मन मात्र कुढत असत,
तुझ्या आठवणींच्या वादळात.

कळत नाही आता
कस समजावू ह्या मनाला ?
घरा बाहेर असलीस तरी
भेटणार नाहीस तू माला.

मला माहित असल तरी
मनाला ते कळणार कस ?
मग तुझ्या माझ्या भेटीच हे
गणित मग जमणार तरी कसं ?

आपल्या अप्रत्यक्ष भेटीचा आता,
पाउसच एक दुआ उरलाय.
आणि आपल्या भेटीचा आता
हाच एक मार्ग उरलाय!.

पाउस पडून गेल्यावर आता
वातावरणानात मंद गारवा आलाय!
आपल्या कड़े पाठ फिरवून आता
पाउस सुद्धा परत चाललाय.

---------
 - साहिल 
---------

Blog Pages