Wednesday, 4 June 2008

शब्द !...

का कोणास ठाउक 
मौनात कुठे शब्द आज शोधतो 
परिघावरून चालतानाही
वर्तुळ केंद्र शोधतो


मनात येणाऱ्या प्रश्नांना
अंत कधीही नसेल
मग शब्द हरवलेल्या ह्या माणसाला
स्थैर्य कधी लाभेल?

भावनांची घुसमट नुसती
आणि पदों पदी तडजोड
नको वाटे ही नुसत्या
पुतळ्यां सोबताची दौड़

पुढे कोण नि मागे कोण
कधी न कळे कोणाला
जिंकेल ह्या शर्यतीत तो
शब्द सापडेल ज्याला.

        - साहिल 

Blog Pages